• Sun. Jun 22nd, 2025

दयानंद कला महाविद्यालयाच्या IQAC अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंक्युबॅशन सेंटर तर्फे करियर मार्गदर्शन कार्यशाळा

Byjantaadmin

Aug 27, 2023

दयानंद कला महाविद्यालयाच्या IQAC अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंक्युबॅशन सेंटर तर्फे करियर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत आयटी फेलिक्स सिस्टिम्स, पुणे येथील संचालक श्री विकास वारके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कला महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करू शकत नाहीत हा गैरसमज दूर करण्याबरोबरच कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एक क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत आणि त्यासाठी त्यांनी कोणती कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे याविषयीचे मार्गदर्शन श्री विकास वारके यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
पदवीच्या प्रथम वर्षापासूनच आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याविषयीचा विचार सुरू करून पदवी अंतिम वर्षामध्ये त्या स्वरूपाचे कोर्सेस पूर्ण होणे आवश्यक आहे. फुलस्टेग डेव्हलपमेंट आणि युआययुएक्स या दोन कोर्सेस च्या माध्यमातून ॲनिमेशन,फॅशन, इंटेरियर डिझाईन आणि कला महाविद्यालयातील विद्यार्थी करियर करू शकतात याविषयीचे मार्गदर्शन त्यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही माहिती नवीनच असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून आपल्या मनातील शंकांचे समाधान करून घेतले.यावेळी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंक्युबॅशन सेंटरचे प्रमुख नितीन डोके यांनी केले. डॉ ऐश्वर्या कंकाळ यांनी श्री विकास बारके यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड आणि उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्नीकर तसेच प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ. अंजली जोशी उपस्थित होत्या.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध स्किल निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. आयटी क्षेत्रातील संधींचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ प्रशांत मान्नीकर यांनी बदलत्या काळामध्ये आयटी क्षेत्रातील संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांची मदत घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ. अंजली जोशी यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्थेने आयटी फेलीक्स सिस्टिम्स,पुणे यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे. त्या अंतर्गत दयानंद शिक्षण संस्थेतील सर्व महाविद्यालयातील प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांनी तसेच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनीही ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ मध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्किल्सचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा.सुवर्ण लवंद,प्रा. दुर्गा शर्मा, प्रा देशमुख, प्रा.इरफान,प्रा.काकडे,प्रा.पूजा खोडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *