लातूर – दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधी महाविद्यालय, लातूर येथे असोसिएशन ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन्स इन इंडिया (AOMSI) यांच्या मार्गदर्शनांतर्गत राष्ट्रव्यापी ट्रॉमा जागरूकता मोहीम-२०२३ ची सुरूवात करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून एम.आय.डी.एस.आर. डेंटल कॉलेज-हॉस्पिटल लातूर व दयानंद विधी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचा एक भाग म्हणून अपघात सुरक्षा राष्ट्रीय जनजागृती अभियान-2023 कार्यक्रमाचे आयोजन दयानंद विधी महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पुनम नाथानी, समन्वयक डॉ. ममता पारीक, प्रमुख पाहुणे म्हणून ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे डॉ. अमोल डोईफोडे व डॉ. कोमल हार्डे तसेच प्रात्यक्षिकाकरीता डॉ रोहिणी चिल्मे, डॉ शुभम भेळे, सानिका मेणेके आणि इंटर्स विद्यार्थी तर प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यालयीन अधिक्षक श्री. धनराज जोशी हे उपस्थित होते.
अपघात या ज्वलंत समस्येवर एक सहयोगी प्रयत्न म्हणून ट्रामा आणि रस्ता सुरक्षा जागरूकता या विषयावर या कार्यक्रमाच्या माध्यमाने प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर टीम सदस्यांनी डॉक्टरांद्वारे अपघाताच्या ठिकाणी प्रारंभिक आघात पुनरुत्थानाच्या प्रात्यक्षिकांसह ट्रॉमा आणि रोफी जागरूकता यावर विस्तृत चर्चा केली. यामाध्यमाने रस्त्यांवर होणार अपघात झाले तर खबरदारी म्हणून प्रथम एका सुरक्षित ठिकाणी संबंधीतास नेहणे. त्यावर प्राथमिक उपचार गरज भासल्यास सी.पी.आर. देणे. तसेच रूग्णवाहिणी (अम्ब्युलन्स) ला भ्रह्मणध्वनीद्वारे बोलावणे. डॉक्टर किंवा तज्ज्ञाच्या सल्याशिवाय पाणी किंवा कोणत्याही पदार्थाचे सेवन अशा स्थिती रूग्णास न करू देणे. अशा अनेक गोष्टींचा बोध उपस्थितांना कार्यक्रम तथा प्रात्यक्षिकाच्या मदतीने करून देण्यात आला. एम.डी.एस.आर. डेंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकाद्वारे समाजात एक प्रभावी सामाजिक संदेश देत रोड सेफ्टी अवेअरनेस ह्या ऊर्जावान पथनाट्याने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रिया पाटील तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ एस. बी. माने यांनी मानले. या कार्यक्रमाचा लाभ प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे घेतला.
दयानंद विधी महाविद्यालयात अपघात सुरक्षा राष्ट्रीय जनजागृती अभियान-2023 कार्यक्रम संपन्न
