• Thu. Aug 14th, 2025

करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला, कार उघडण्याचाही प्रयत्न; पोलिसात गुन्हा दाखल

Byjantaadmin

Aug 26, 2023

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा  यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये त्यांच्या कारवर दगडफेक करून कारचं मोठं नुकसान करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे हल्लेखोरांनी त्यांची कार देखील उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी यासाठी बीडमध्ये नवीन घर देखील घेतले आहे. दरम्यान,  करुणा शर्मा यांच्या बीडमधील घरासमोर लावलेल्या त्यांच्या गाडीवर तअज्ञात हल्लेखोराने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून, हल्लेखोरांनी गाडीत प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला. सर्व प्रकार लक्षात आल्यावर करुणा शर्मा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Karuna Sharma car attacked by unknown persons in beed करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला, कार उघडण्याचाही प्रयत्न; पोलिसात गुन्हा दाखल

 

धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांनंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, गेल्यावर्षी त्यांनी बीड शहरात घर घेऊन, बीडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तर, धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, आता बीडमध्ये घर घेतलं असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. बीडचे लोकं माझ्यासोबत असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. तेव्हापासून त्या बीडमध्येच राहत आहे. मात्र, त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत. तसेच हा हल्ला कोणी केला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी…

दोन दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पावसाळा सुरु होऊन तीन महिने उलटले आहेत, मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यांच्या सर्व अपेक्षा संपल्या आहेत. त्यात पीक विमा देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत सत्तधारी सभा आणि आपल्या राजकीय कामातच व्यस्थ आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *