भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. याच आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात प्रचंड गाजले. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. ‘फोन टॅपिंग’ मध्ये वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी रश्मी शुक्लांना मोठा दिलासा न्यायालयाने दिला आहेफोन टॅपिंग प्रकरणात आरोपी न सापडल्याने सीबीआयकडून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गुन्हा खरा आहे, गोपनीय कागदपत्रे लीक झाली आहेत, मात्र या प्रकरणात आरोपींचा शोध लागत नाही, आरोपी सापडत नाहीत असा सीबीआयचा दावा होता, तो कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे. दरम्यान गोपनीय कागदपत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कशी आणि कधी गेली, हे समजून येत नाही, असंही सीबीआयने कोर्टाला सांगितलं आहे.गोपनीय कागदपत्रे एसआयडी कार्यालयातून अनोळखी व्यक्तिने चोरी केली असून, काही पत्रांवर दुबार लिखाण झाल्याच दावाcbi ने दावा केला आहे. या प्रकरणीdevendra fadnvis यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याच समजते, याबाबत एका मराठी वृत्तवाहिनेने बातमी दिली आहे.याबाबत सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने ‘फोन टॅपिंग’प्रकरण कायमचे बंद झाले आहे. या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.