• Sat. Aug 16th, 2025

हिंडनबर्गसारखा खळबळ उडवणारा अहवाल येणार? भारतीय कंपनीच्या व्यवहाराचा गौप्यस्फोट होणार?

Byjantaadmin

Aug 25, 2023

अमेरिकेतील संशोधन संस्था हिंडेनबर्ग फर्मने अदानी समूहात कथित घोटाळा झाला असल्याचा दावा करणारा अहवाल प्रकाशित केला. त्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठा भूकंप आला. हिंडेनबर्गचा अहवाल जानेवारी महिन्यात प्रकाशित झाल्यानंतरच्या आठ महिन्यानंतरही त्याचे धक्के जाणवत आहेत. हिंडेनबर्गचा परिणाम अजूनही जाणवत असताना दुसरीकडे आता देशातील काही कॉर्पोरेट घराण्यांबाबत एक अहवाल प्रकाशित होणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. यामध्ये काही कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवहार समोर येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

George Soros-Backed OCCRP To Expose Well Known Indian Corporate Group report like hindenburg on adani OCCRP Report :  हिंडनबर्गसारखा खळबळ उडवणारा अहवाल येणार? भारतीय कंपनीच्या व्यवहाराचा गौप्यस्फोट होणार?

 

देशातील काही कॉर्पोरेट घराणे निशाण्यावर…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट नावाची एक स्वयंसेवी संस्था भारतातील काही कॉर्पोरेट घराण्यांबाबत मोठे गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या गौप्यस्फोटात संबंधित कॉर्पोरेट हाऊसच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीत परदेशी फंडांचा सहभाग असल्याची चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमेरिकन आर्थिक संशोधन आणि गुंतवणूक कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता, नव्याने येणाऱ्या अहवालामुळे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्र, भांडवली बाजाराला धक्का बसू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अहवाल की बातम्यांची मालिका?

या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितले की,  शोध पत्रकारिता करणाऱ्यांचा मंच असल्याचा दावा करणाऱ्या OCCRP कडून भारतीय उद्योजक घराण्यांबाबत एखादा अहवाल अथवा बातम्यांची मालिका प्रकाशित करू शकतात. OCCRP ला ई-मेलद्वारे काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही उत्तरे मिळाली नाहीत

OCCRP म्हणजे काय

संस्थेच्या वेबसाइटनुसार, OCCRP ची स्थापना 2006 मध्ये झाली आणि ही संस्था संघटीत गुन्हेगारीबद्दल अहवाल देण्यात तज्ज्ञ असल्याचा दावा करते. काही माध्यमांसोबतच्या भागिदारीत या संस्थेकडून शोध पत्रकारिता असलेले लेख, बातम्या प्रकाशित केल्या जातात.  ओपन सोसायटी फाउंडेशन या जॉर्ज सोरोस युनिटला निधी देते. विशेष म्हणजे,jarj sors च्या OCCRP ला ज्या इतर संस्थांकडून निधी किंवा आर्थिक मदत मिळते त्यात फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशन यांचा समावेश आहे. जॉर्ज सेरॉसची ही संस्था त्याच्या संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार उघड करणारे अहवाल प्रकाशित करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. युरोप, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत या संस्थेची केंद्रे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *