लातूर जिल्हा बँकेच्या आर्थिक मदतीने युवक शेतकरी झाला रेशीम चा यशस्वी उद्योजक
जिल्ह्यात पहिल्यांदा चॉकी सेंटर गादवड येथे आकाश जाधवला दरमहा ८० हजारांचे उत्पन्न
लातूर ;- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतीपूरक व्यवसायांच्या अंतर्गत तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी २०१७ पासून बिनव्याजी कर्जे २ लाख रुपयांपर्यंत पुरवठा सुरु केला असून त्याचा जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्यामुळे तुती लागवडीत वाढ झाली आहे पूर्वी लातूर जिल्ह्यात चॉकी सेंटर नसल्याने चॉकी (अंडीपुंज) साठी रेशीम उद्योजकाना रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या आळ्या (चॉकी) कर्नाटकातून मागवाव्या लागत असे आता मात्र मराठवाड्यातील रेशीम उद्योजकाना आळ्या गादवड येथील चॉकी सेंटर मधे उपलब्ध आहेत लातूर जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून अनेक उद्योग ऊभे राहीलेले असताना आता यशस्वी रेशीम उद्योजक शेतकरी आकाश जाधव यांनी २ एकर शेती असलेल्या जिल्हा बँकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने यशस्वी उद्योजक म्हणून उभा राहिला आहे आज दरमहा सव्वा लाख रुपयांची उलाढाल खर्च वजा जाता दरमहा ८० हजार रुपये उत्पन्न मिळवत यशस्वी उद्घोजक तयार झाला आहे
रेशीम उद्योग व चॉकी सेंटर ला माजी मंत्री दिलीपराव देशमुख बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांची भेट
लातूर जिल्ह्यातील गादवड येथील आकाश जाधव या तरुण शेतकऱ्यांनी सुरवातीला जिल्हा बँकेकडून बिनव्याजी २ लाख रेशिम लागवडी साठी कर्ज घेतले ते मुदतीत फेडले पुन्हा चॉकी सेंटर साठी १२ लाख रुपये कर्ज घेतले त्याची उभारणी केली यातून आज नवीन उद्योजक तयार झाला या चॉकी सेंटर मुळे मराठवाड्यातील रेशीम उद्योजकाना अंडीपुंजासाठी साठी बेंगलोर येथे जावे लागत असे आता मात्र लातूर जिल्ह्यांतील पहिले चॉकी सेंटर गादवड येथे ऊभे राहिल्याने रेशिम उद्योजक इथे खरेदी साठी येत उलाढाल सुरु झाली आहे या चॉकी सेंटर व रेशीम उद्योगाची जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी रेशीम उद्योग चॉकी सेंटर ची पाहणी केली समाधान व्यक्त करत या उद्गोगासाठी युवक शेतकऱ्यांनी पुढें येण्याची गरज आहे जिल्हा बँक यासाठी सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली तसेच नविन उद्योजक आकाश जाधव यांचेही कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँक मातृत्वाच्या भूमिकेत
राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना, सहकारी संस्था, पतसंस्था, पगारदार कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करून जिल्ह्यातील लोकांसाठी मातृत्वाची भूमिका बजावली आहे जिल्हा बँक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून राज्यात वेगळेपण जपलेले आहे.
यशस्वी उद्योजक आकाश जाधव ला मिळतात दरमहा ८० हजार रुपये उत्पन्न
गादवड येथील जिल्हा बँकेकडून रेशीम उद्योग व चॉकी सेंटर ला आर्थिक मदत मिळालेल्या आकाश जाधव दरमहा १ लाख २५ ते ३० हजार रुपये उलाढाल करीत असून त्यात खर्च वजा होता त्यांना साधारणतः ७५ ते ८० हजार रुपये दरमहा उत्पन्न मिळत आहे अशी माहिती आकाश जाधव यांनी दिली..