• Sat. Aug 16th, 2025

ज्याला पकडायला सांगितलं त्याच मोबाईल चोराबरोबर महिला अधिकारी रंगेहाथ अटकेत

Byjantaadmin

Aug 25, 2023

मुंब्रा पोलीस स्टेशनमधील महिला सहाय्यक पोलीस निरिक्षकाला एका मोबाईल चोरावर कारवाई करण्यास सांगण्यात आलं. मात्र, संबंधित महिला अधिकाऱ्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी मोबाईल चोरालावर स्वतःच धाड टाकली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या धाडीत आरोपी मोबाईल चोराबरोबर ही महिला पोलीस अधिकारीही सापडली आहे. आरोपी मोबाईल चोराचं नाव सबिर शेर अली सय्यद असं आहे, तर आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव कृपाल बोरसे असं आहे.

Mobile thief accuse with women police officer

 

एका तक्रारीनंतर वांद्रे पूर्वमधील खेरवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यात त्यांना संशयित आरोपी मुंब्रामधील असल्याचं लक्षात आलं. त्याने असेच गुन्हे विलेपार्ले भागातही केल्याचं समोर आलं. यानंतर खेरवाडी पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क केला आणि मोबाईल चोर आरोपी सबिर शेर अली सय्यद याला अटक करण्यासाठी मदत मागितली. यावेळी मुंब्रा पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरिक्षक कृपाल बोरसे यांनी खेरवाडी पोलिसांना आपण काही दिवस सुट्टीवर जात असल्याचं म्हणत काही दिवस थांबण्यास सांगितले, असं वृत्त मिंटने दिलं आहे.

मोबाईल चोर आणि महिला पोलीस अधिकाऱ्यात शेकडो कॉल”

या वृत्तानुसार, खेरवाडी पोलिसांना मोबाईल चोर सबिर सय्यदची ओळख पटवण्यात यश आलं. पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबरही मिळाला. या नंबरवरील कॉल रेकॉर्ड तपासले असता खेरवाडी पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. आरोपी सय्यद आणि महिला पोलीस अधिकारी बोरसे यांच्यात काही महिन्यांमध्ये शेकडो कॉल झाल्याचं उघड झालं.

“महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवरून चोराचा माग”

७ ऑगस्टला खेरवाडी पोलिसांना आरोपी नवी मुंबईहून मुंबईला येत असल्याचं समजलं. मात्र, आरे येथे आल्यावर त्याचा मोबाईल बंद करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या फोनचा माग काढला. त्यावेळी ही अधिकारीही याच परिसरात असल्याचं स्पष्ट झालं. ती पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालं.यानंतर खेरवाडी पोलिसांनी या हॉटेलवर जाऊन कारवाई केली. तेव्हा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीबरोबर पोलिसांना मुंब्रा पोलीस स्टेशनची महिला पोलीस अधिकारीही आढळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *