• Sat. Aug 16th, 2025

लोकसभा निवडणुकीत राज्यात ‘मविआ’ दाखवणार ‘महायुती’ला अस्मान; काँग्रेस वरचढ ठरणार

Byjantaadmin

Aug 25, 2023

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षांतील हुकमी एक्के आपल्या गोटात ओढण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. पण महाराष्ट्रात भाजपला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.इंडिया टुडे – सी व्होटरच्या एका सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील. या सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत मविआतील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीला सर्वाधिक 28 जागा मिळतील. यात ठाकरे व पवारांच्या पक्षांचा 18 जागा मिळतील. तर काँग्रेसचा 10 जागांवर विजय होईल.दुसरीकडे, भाजपला या निवडणुकीत अवघ्या 15 जागा मिळतील. तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गटाला अवघ्या 5 जागांवर विजय मिळेल, असे या सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.

प्रस्थापितांना BRS व वंचितचा फटका बसणार

या सर्व्हेत महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीवर वंचित बहुजन आघाडी व भारत राष्ट्र समितीच्या कामगिरीचा निकालावर परिणाम दिसणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या 2 पक्षांचा प्रस्थापित राजकीय पक्षांना फटका बसणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

अतितटीची लढाई होण्याचे संकेत

दुसरीकडे, राष्ट्रीय पातळीवरही भाजप प्रणित एनडीए व काँग्रेस प्रणित विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये मतांच्या टक्केवारीचा फारसा फरक दिसत नाही. या सर्व्हेनुसार, एनडीएला 43 टक्के, तर इंडियाला 41 टक्के मतदान मिळेल. या प्रकरणी दोन्ही आघाड्यांना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत अवघ्या 2 टक्क्यांचा फरक असल्यामुळे लोकसभा निवडणूक फारच अतितटीची होताना दिसून येत आहे.

केव्हा झाला सर्व्हे?

इंडिया टुडे – सी व्होटरचा हा सर्व्हे जुलै ते ऑगस्ट दरम्यान लोकसभेच्या 543 मतदार संघांत करण्यात आला. त्यात जवळपास 25951 जणांनी आपली मते नोंदवली. या सर्वांनी लोकसभा निवडणुकीत एनडीएला 306, इंडिया आगाडीला 193, तर इतर पक्षांना 44 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार

यासंबंधीच्या आकडेवारीनुसार, भाजपला सर्वाधिक 287 जागा मिळतील. तर काँग्रेसला 74, तर अन्य राजकीय पक्षांचा 182 जागांवर विजय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *