• Sun. Aug 17th, 2025

कर्नाटकात काँग्रेसच्या ‘ऑपरेशन हस्त’ला सुरुवात; धजदच्या माजी आमदाराचा पक्षात प्रवेश

Byjantaadmin

Aug 25, 2023

कर्नाटकात काँग्रेसकडून ‘ऑपरेशन हस्त’ला सुरुवात झाली असून त्याचा पहिला फटका माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांना बसला आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून विधानसभा निवडणूक लढलेले माजी आमदार आयनूर मंजुनाथ यांनी आज आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भाजप आणि धजदमधील नाराजांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे.

Janata Dal former MLA joins Congress

 

दरम्यान, येत्या काही दिवसांत १५ ते २० आजी-माजी आमदार congress मध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा काँग्रेस नेते तथा कॅबिनेट मंत्री चेलुवरायस्वामी यांनी चार दिवसांपूर्वीच केला हेाता. त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. भाजपमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे ऑपरेशन हस्त रोखण्याची जबाबदारी भाजपने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर सोपवली आहे. माजी आमदार आयनूर मंजुनाथ यांचे काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा देऊन स्वागत करण्यात आले. मंजुनाथ यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मागितले होते. मात्र, त्यांना तिकिट मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांनी धजदमध्ये प्रवेश केला होता. धजनच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) कर्नाटकात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. सुमारे १५ ते २० आमदार काँग्रेसने गळाला लावले असून या आमदारांचा काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधी पक्षातील आमदारांना गळाला लावण्याचे काम कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार करत असल्याचे पुढे येत आहे. त्यांचे पहिले लक्ष्य हे यशवंतपूरचे भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर आहेत. कारण सोमशेखर यांनी नुकतीच समर्थकांची बैठक घेतली, त्यात कार्यकर्त्यांनी सोमशेखर यांना ‘ग्रँड ओल्ड पार्टी’मध्ये सामील व्हावे, यासाठी सुचविले आहे. विशेष म्हणजे त्या बैठकीला नेलमंगलचे काँग्रेसचे आमदार श्रीनिवास उपस्थित होते. त्यांनी ‘सोमशेखर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे,’ असे स्पष्ट केले. सोमशेखर यांच्याबरोबरच माजी मंत्री के. सी. नारायणगौडा, माजी मंत्री शिवराम हेब्बार आणि भैरती बसवराजही काँग्रेसच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *