श्रमदानातून सामनगावात दोन हजार रोपट्यांची लागवड; दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लायन्स क्लब, ग्रामपंचायत आणि वसुंधरा प्रतिष्ठानचा पुढाकार
लातूर ;- वृक्ष लागवड आणि संवर्धन हे राष्ट्रहित कार्य मानून लातूर तालुक्यातील सामनगाव या गावात दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब लातूर, ग्रामपंचायत कार्यालय सामनगाव आणि वसुंधरा प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने दिवसभर श्रमदान करून तब्बल २ हजार पर्यावरण पूरक रोपट्यांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी आणि कोषाध्यक्ष सीए संजय बोरा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रा.से.यो.विद्यार्थी, लायन्स क्लब टीम आणि वसुंधरा प्रतिष्ठानची टीम यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव हरित करण्यासाठी पुढाकार घेतला.
या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाला लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल मन्मथ भातांब्रे, संस्थापक रामपाल सोमाणी, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.अशोक पांचाळ,ला.सुदर्शन कंजे,ला.सतीश नरहरे, प्रा.गोपालप्रसाद आवस्थी, सरपंच सौ.प्रिती बुलबुले, उपसरपंच सौ.स्वाती बुलबुले, ग्रामपंचायत सदस्य सौ.मीरा झुंजारे, ग्रामसेवक शिवकुमार नरवणे, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गणेश लहाने, क्रीडा संचालक डॉ. नितेश स्वामी, एस.आर. मोरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.विशाल वर्मा, वसुंधरा प्रतिष्ठानचे वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान प्रमुख राहुल माशाळकर या समवेत सर्व सहभागी विभागांचे पदाधिकारी, सदस्य, ईश्वर बुलबुले, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.विशाल वर्मा यांनी केले. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव रमेश बियाणी म्हणाले, वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असून, यात प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आहे. मी स्वतः माझ्या वाढदिवसानिमित्त चार एकरमध्ये वृक्ष लागवड केली असून, लावलेल्या झाडांचे संवर्धन करणार आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर वृक्षारोपण करून या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर गावातील प्रत्येक घरासमोर, बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, गावातील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकले विद्यार्थीही वृक्षारोपण करण्यासाठी पुढे आले. यावेळी लायन्स क्लबच्या लातूर शाखेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यात अग्रेसर असणारे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष सीए संजय बोरा, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम पवार,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.विशाल वर्मा, ग्रामपंचायत कार्यालय सामनगाव आणि वसुंधरा प्रतिष्ठानच्या टीमचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सह-कार्यक्रमाधिकारी प्रा.योगेश शर्मा यांनी तर आभार प्रा.अशोक पांचाळ यांनी मानले.
या वृक्षारोपण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी गावातील बालाजी बुलबुले, विकास बुलबुले, शिवराज गुणवंत बुलबुले, साधु झुंजारे, तुकाराम झुंजारे, विजयमुर्ती येलुरकर, दत्तात्रय बुलबुले, श्रीकृष्ण काळे, दत्ता बुलबुले, सिद्धार्थ डोळसे, राम डोळसे, सचिन ढगे, सोमनाथ बुलबुले, शिवानंद बुलबुले, विनोद बुलबुले, प्रा.अक्षय पवार, प्रा.लता जाधव, प्रा.दीपक सूर्यवंशी, प्रा.अजय चव्हाण, प्रा.अनुजा कांबळे, प्रा.के.व्ही.पाचंगे, राठोड सर,वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोलअप्पा स्वामी, कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. अजित चिखलीकर वृक्ष लागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर, शहराध्यक्ष उमेशआप्पा ब्याकोडे, सदस्य संतोष धनुरे, लिओ क्लबचे संजय माकुडे, गजानन मिश्रा यांच्यासह ग्रामस्थ आणि रासेयो समिती, स्वयंसेवक आदींनी परिश्रम घेतले.