शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडेंविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला ? असा सवाल उपस्थित करून पनवेल सत्र न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहे. तसेच याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्ये होऊनही भिडेंविरोधात गुन्हा दाखल का करत नाही? असे म्हणत अॅड. अमित कटारनवरे यांनी याचिका दाखल केली होती.अॅड. कटारनवरे यांच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांवर कठोर ताशेर ओढले. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरही संभाजी भिडे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून घेण्यास एवढा विलंब का लागला ? असा सवाल पनवेल सत्र न्यायालयाकडून नवी मुंबई पोलिसांना केला.
तसेच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत भिडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबामागील कारणांची प्रशासकीय स्तरावर चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.