काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या लेह लडाखच्या दौऱ्यावरती आहेत. लडाखमध्ये त्यांनी आज एका सभेत लोकांना संबोधित केलं. यावेळी बोलतना त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, “केंद्र सरकार चीनबाबत संपूर्ण सत्य सांगत नाही. लडाख हे मोक्याचे ठिकाण आहे. चीनने लडाखमधील भारताची हजारो किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे, असे असतानाही मोदी सरकारकडून मात्र चीनने जमीन बळकावली नाही, असे वारंवार खोटे बोललं जात आहे, असा आरोप गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले, “चीनने एक इंचही जमीन हिसकावून घेतली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सभेत म्हटले होते, हे खेदजनक आहे. पंतप्रधान पूर्णपणे खोटे बोललेले आहेत. लडाखच्या प्रत्येक माणसाला माहित आहे की, चीनने लडाखची जमीन घेतली आहे. पंतप्रधान खरे बोलत नाहीत. लडाख दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी कारगिलमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.
गांधी पुढे म्हणाले, “मी लडाखच्या कानाकोपऱ्यात गेलो. लोकांशी बोललो. आणखी एक नेता आहेत ( पंतप्रधान नरेंद्र मोदी) , ते फक्त मन की बात करतात. मात्र मला वाटले की मी तुमचे म्हणणे ऐकावे. इथे येऊन मी लडाखमधील लोकांच्या समस्या आणि त्यांचे खरे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला.””लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले, पण लडाखला दिलेले वचन पूर्ण झाले नाहीत. लडाखच्या कानाकोपऱ्यातील तरुणांशी बोलल्यास, लडाख हे berojgariचे केंद्र बनले आहे, हे लक्षात येईल. येथे फोन नेटवर्कचा प्रश्नही लोकांनी मांडला होता. तसेच लडाखमध्ये विमानतळ बांधले आहे, पण येथे विमाने येत नाहीत,’ असे ही राहुल गांधी म्हणाले.