• Sun. Aug 17th, 2025

“फोडाफोडीचे संस्कार कुणाचे ते देशाला…”, सुप्रिया सुळेंच्या आरोपानंतर बावनकुळेंचं रोखठोक उत्तर

Byjantaadmin

Aug 24, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला. त्या असं म्हणाल्या की भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन ते तीन वेळा फोडण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. ज्यानंतर भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळेंना थेट प्रत्युत्तर दिलं. आम्ही कुणाचाही पक्ष फोडलेला नाही. फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत ते देशाला आणि महाराष्ट्राला माहित आहे असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

What Bawankule Said?

 

चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश

“आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्याचं काम केलेलं नाही. ते आमचे संस्कार नाहीत. असे फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत? हे देशाला आणि राज्याला माहित आहे. त्यांना त्यांचे संस्कार लखलाभ. इतरांचे पक्ष फोडण्याचं राजकारण ज्यांनी आयुष्यभर केलं, आता तेच लोक आमच्यावर बोलत आहेत.SUPRIYA SULE या आमच्या ताई आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जरा पाहा, कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली ते समजेल.” असं सडेतोड प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलं आहे.

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले बावनकुळे?

एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली आहे. तरAJIT PAWAR यांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली आहे. शरद पवारांचं घर फुटलं कारण ते घर सांभाळू शकले नाहीत. आता सुप्रिया सुळे आमच्यावर आरोप करत आहेत. मात्र मला हा विश्वास आहे की आगामी काळातSHARAD PAWAR यांचं मन परिवर्तन होईल आणि ते मोदींना पाठिंबा देतील असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी काय आरोप केला होता?

“राष्ट्र्वादी पक्ष फोडण्याचा भाजपचा हा पहिलाच प्रयत्न नाही. तर याआधीही त्यांनी तीन वेळा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला त्यांना यश आलं नाही. पण तिसऱ्यावेळी त्यांना यश आलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. तसंच भाजपाचे १०५ आमदार कष्टाने निवडून आले त्यांच्याबाबत मला वाईट वाटतं” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. या सगळ्या आरोपांना बावनकुळेंनी उत्तर दिलं असून फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं? हे सांगत असताना नाव न घेता शरद पवारांकडेच बोट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *