डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात बुधवारी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्षीरसागरांचा प्रवेश झाला. त्यामुळे बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे. पक्षात प्रवेश करताच योगेश क्षीरसागरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देत अजितदादांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडसाठी नवे संकेतही दिले.”खरीप पीक काही प्रमाणात वाया गेले आहे. मात्र, मराठवाड्यात परतीचा पाऊस येत असतो. धरणातील पाणीसाठा तुलनेने कमी आहे. हे नवीन संकट राज्यावर आले आहे. परंतु, आपण काळजी करु नका. कसलेही संकट आले तरी तुमच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभा आहे”, असा विश्वासही ajit pawarनी क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांना दिला.
डॉ.योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या समर्थकांनी विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. आता त्यांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही. बीडमध्ये एक नवीन नेतृत्व पुढे येत आहे”, असे म्हणत डॉ.योगेश क्षीरसागर यांचे अजित पवारांनी कौतुक केले.”सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा आपलाNCP पक्ष आहे. त्यात कुठेही आम्ही बदल होऊ देणार नाही. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी सर्वांनी मजबूतीने उभे रहा. तुमची सर्वांची साथ त्यांना महत्त्वाची आहे”, असे आवाहनही अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले.