• Sun. Aug 17th, 2025

४२ एक्सप्रेस गाड्यांना महाराष्ट्रात विविध स्थानकांवर थांबे

Byjantaadmin

Aug 24, 2023

नागपूर: मध्य रेल्वेने ४२ एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबे जाहीर केले. रेल्वे विभागाकडे विविध भागातून रेल्वे स्थानकांवर थांबे मिळावेत म्हणून मागणी करण्यात आली होती. ती मागणी मंजूर करत विविध स्थानकांमध्ये थांबे देण्यात आले आहेत.

कोल्हापूर धनबाद एक्सप्रेसला NAGPUR विभागातील पिंपळखुट्टी स्थानकात थांबा देण्यात आला आहे. तर कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकात निझामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस आणि एलटीटी कोचिवली एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. नागपूर,KALYAN  होटगी, कोपरगाव आणि कान्हेगाव स्थानकावर गाड्यांना सहा महिन्यांसाठी प्रायोगिक थांबा देण्यात आला आहे.

Central Railway announced stops 42 express trains different railway stations Maharashtra

नागपूर स्टेशन

  • यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिला दुरांतो एक्सप्रेस दि. २६.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १६.१५ वाजता पोहोचेल आणि १६.२० वाजता सुटेल.
  • दिल्ली सराई रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस दि. २८.८.२०२३ रोजी रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १३.२५ वाजता पोहोचेल आणि १३.३० वाजता सुटेल.

कल्याण स्टेशन

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा दुरांतो एक्सप्रेस २३.०८.२०२३ रोजी सुरू होणारा प्रवासापासून कल्याण येथे १७.५९ वाजता येईल आणि १८.०१ वाजता सुटेल.
  • हावडा-CSTM टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस दि. २३.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून ट्रेन ०७.०० वाजता पोहोचेल आणि ०७.०२ वाजता सुटेल.
  • पाटणा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुविधा एक्सप्रेस प्रवास दि. २३.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १३.३३ वाजता येईल आणि १३.३५ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटणा सुविधा एक्सप्रेस प्रवास दि. २५.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १२.०० वाजता येईल आणि १२.०२ वाजता सुटेल.
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसचा दि. २४.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १४.०३ वाजता पोहोचेल आणि १४.०५ वाजता सुटेल.
    • विशाखापट्टणम – साईनगर शिर्डी एक्सप्रेस २४.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून ०९.५३ वाजता पोहोचेल आणि ०९.५५ वाजता सुटेल.
    • साईनगर शिर्डी -विशाखापट्टणम एक्सप्रेस २५.८.२०२३ रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून २०.०८ वाजता पोहोचेल आणि २०.१० वाजता सुटेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *