जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते बेल वृक्ष लागवड
लातूर (जिमाका) : जिल्ह्यात वृक्ष लागवडीला गती देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या बेल वृक्षांसह दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली. श्री बसवेश्वर महाविद्यालय येथे सोमवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त रामदास कोकरे, सुपर्ण जगताप, दिपरत्न निलंगेकर, शिवशंकर चापुले, डॉ. सितम सोनवणे, अॅड. राहुल मातोळकर, भीम दुनगावे यांनी लातूर वृक्ष चळवळीच्या वत्तीने डॉ बी आर पाटील, डॉ दशरथ भिसे ,अॅड. सुनील गायकवाड, श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, डॉ. बी आर पाटील, उपप्राचार्य प्रो. डॉ. राजकुमार लखादिवे, प्रा. संजय पवार, प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, कॅप्टन प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. किसनाथ कुडके, क्रीडा समिती सदस्य डॉ. गुणवंत बिरादार यावेळी उपस्थित होते.