राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या जिल्ह्यातील मान्यवरांनी घेतल्या भेटी विविध विषयवार केली चर्चा
लातूर ;-राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांची आशियाना बंगल्यावर सोमवारी जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेटी घेतल्या विविध विषयवार चर्चा केली याप्रसंगी कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, प्रा सुधीर अनवले,संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष रामदास पवार उपस्थित होते
जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा
जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी पावसाचे अत्यल्प प्रमाण , पिकाची परीस्थिती, पिण्याचे पाणी, विकास कामे आदी विषयवार चर्चा केली
लातूर शहर, रेणापूर औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ, चाकुर ,उदगीर तालुक्यातील शेतकरी उस उत्पादक सभासद कोंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते