राज्यात ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांने चांगली वागणूक द्रत नाहीत. भरमसाठ वीज बिल पाठवून त्यांची पिळवणूक करत आहेत. तर, दुसरीकडे महावितरणचे अधिकारी टेंडरमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार करतात याची पोलखोल भाजप आमदारांनी केली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील तीन मंत्री यावेळी उपस्थित होते. हा प्रकार जिल्हानियोजन समितीच्या बैठकी दरम्यान जळगाव येथे घडला.
आमदार मंगेश चव्हाण यांनी याच बैठकीत महावितरण विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. तसेच, महावितरणचे अधिकारी कशा पद्धतीने टेंडरमध्ये भ्रष्टाचार करतात याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित केला.आमदार मंगेश चव्हाण यांनी तीन मंत्र्यांसमोरच एका ठेकेदाराला फोन लावला. यावेळी त्यांनी आपला फोन स्पीकर मोडवर ठेवला होता. आमदार आणि ठेकेदार यांचे ते संभाषण उपस्थित सर्व मंत्र्यांसह सर्व सदस्यांना ऐकवला.आमदारांनी फोन केल्यावर त्या ठेकेदाराने अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी 1 कोटीच्या बिलासाठी 20 लाख रुपये हप्ते घेतल्याची आपबिती सांगितली. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीतच आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण विभागासह विविध विभागातील हप्ते खोरीची पोल खोल केल्यामुळे एकच चर्चा सुरु झाली.या प्रकारानंतर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल भाईदास पाटील या तिन्ही मंत्र्यांनी संबंधित महावितरण अधिकारी यांच्यावर संताप व्यक्त करत कारवाई करण्याचे आदेश दिले.