• Tue. Aug 19th, 2025

महाराष्ट्रातील सरकार हे येड्याचं सरकार; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात

Byjantaadmin

Aug 21, 2023

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागलं. औरंगाबाद शहरातील पीएस महाविद्यालयात दिवशी सर्व्हर डाऊनचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला. सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकलं नाही. त्यामुळे तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागले. तब्बल पाऊण तासानंतर सर्व्हर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर, येड्यांचं सरकार आहे. बेरोजगारांना नोकरी देण्यापेक्षा बेरोजगारांचे खिसे कापण्यावर त्यांचा जास्त जोर आहे. दोन हजार जागांसाठी 15 – 15 लाख अर्ज येतात. त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारल्या जाते. अरबो रुपये जमा केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *