• Tue. Aug 19th, 2025

ईव्हीएम मशीन्स पोहोचल्या, निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग; संकेत काय?

Byjantaadmin

Aug 19, 2023

इंडिया आघाडी आणि एनडीएने loksabha election जोरात तयारी सुरू केली आहे. कोणत्याही आघाडीत नसलेल्या राजकीय पक्षांनीही निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीनेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांच्या जोरबैठका सुरू आहेत. मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सभा घेण्यावरही भर दिला जात आहे. राजकीय पक्षच काय, निवडणूक आयोगही निवडणुकीच्या कामाला लागला आहे. नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालायत ईव्हीएम मशीन्स आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहेत

ईव्हीएम मशीन्स नागपुरात पोहोचल्या, निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग; संकेत काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानं, राज्यातील सर्वच जिल्हा प्रशासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरु केली आहे. नागपूर जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी, जिल्ह्यात दाखल झालेल्या ईव्हीएमच्या तांत्रिक अडचणी दूर करणे आणि नवीन पक्षाचे चिन्ह ॲड करण्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *