• Tue. Aug 19th, 2025

संरक्षणासाठी महिलांना शस्र दिली पहिजेत; नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य

Byjantaadmin

Aug 19, 2023

हिलांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. सतत महिला अत्याचाराचा मुद्दा पुढे येतो. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. सरकार याला सहमत असेल की नाही माहिती नाही पण मला असं वाटतं की, वेळप्रसंगी मुलींना, महिलांना संरक्षणासाठी शस्र दिली पहिजेत, असं माझं मत आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. रेल्वे डब्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी एक गार्ड देण्यात करण्यात आलेला आहे. तसंच महिलांच्या डब्यांमध्ये पुश बटन आणि पॅनिक बटन देखील उपलब्ध करून देणार आहोत, असं म्हणाल्या आहेत.गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असतं की आपल्याला कायद्यामधून कोणी पकडणार नाही. बाकी सर्व केसेसमध्ये चार शीट झालेले आहे हे मला पोलिसांनी सांगितलं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झालेला आहे अल्पवयीन मुलगी असेल तर त्याच्यावर झाले असतील तर लवकर चारशीट होईल. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या देखील बातम्या दिल्या पाहिजेत, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

Neelam Gorhe Statement : संरक्षणासाठी महिलांना शस्र दिली पहिजेत; नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रूग्णांचा मृत्यू झाला. यावर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं. या रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे.परंतु कोविड काळात आणि कोविड नंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते. याची वस्तुस्थिती काय आहे. हे का घडलं याच्या खोलामध्ये जाण्यासाठी राज्य सरकारने शोध समिती नेमलेली आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.नेमलेल्या समितीचा अहवाल जरी आला. तरी यातील काही मुद्दे एखादी दुर्घटना झाल्यानंतर ही त्यावर कारवाई होतच असं नाही. बराचशा रुग्णालयात सीसीटीव्ही लावलेले असतात. मात्र त्यांचं निरीक्षण आरोग्य व्यवस्थेने करणं गरजेचं असतं. रुग्णालयात औषधांचा साठा पुरेसा नसल्याने काही वाईट परिणाम झाला आहे की नाही ते समजून घेणं, या घटनेमध्ये आयसीयूमध्ये मुद्दाम काही घडलं आहे की नाही हे या समितीच्या अहवालात दिसेल परंतु निपक्ष:पातीपणे चौकशी व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी निधी आणि मनुष्यबळासाठी कशी चालना देता येईल. यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने आणि ठाणेकरांना कशी मदत करता येईल हाच माझा हेतू आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *