पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ‘डीआरडीओ’चा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्ज, तसेच आवाजाच्या चाचणीवर शुक्रवारी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी झाली.
पुणे : डीआरडीओचे माजी संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात शुक्रवारी शिवाजी नगर कोर्टात सुनावणी झाली. कुरूलकर यांच्या यांचा जामीन अर्ज, तसेच आवाजाच्या चाचणीवर देखील सुनावणी झाली. दरम्यान, कोर्टात वेळेत सुनावणीस उपस्थित राहत नसल्याने कोर्टाने राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.मीन अर्जावर, तसेच आवाजाच्या चाचणीवर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी देखील सुनावणी होती. या साठी शुक्रवारी वेळ निश्चित करण्यात आली होती. सरकार पक्षाचे आणि बचाव पक्षाचे वकील सुनावणीस उपस्थित होते. मात्र, एटीएसचे तपास अधिकारी सुनावणीला उपस्थित नव्हते. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आल्यावर न्यायाधीशांनी एटीएसच्या अधिकाऱ्यांना सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, एटीएसचा कोणताही अधिकारी उपस्थित न राहिल्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले. न्यायालयाने निश्चित केलेल्या सुनावणीस एटीएस अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागेल, असा आदेश न्यायालयानं दिला.
शुक्रवारी कुरलकर याला येरवडा कारागृहातून दूरसंवाद प्रणालीद्वारे हजर करण्यात आले. त्यानंतर एटीएसचे अधिकारी सुनावणीस उपस्थित राहिले. बचाव पक्षाचे वकील अॅड. हृषीकेश गानू यांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील अॅड. विजय फरगडे यांनी कुरुलकरने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितली.दरम्यान, डीआरडीओचे माजी संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईल मधून काही अॅप्स डिलीट केले आहेत. याची माहिती पुणे फॉरेन्सिक लॅबने कोर्टाला दिली आहे. या डिलीट केलेल्या अप्लिकेशन्सकडून कुरुलकर यांनी आणखी कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली आहे का, याचा तपास एटीएस करत आहे.