जय भारत विद्यालयाचे 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 8 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
निलंगा: (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2021-22 मध्ये जय भारत विद्यालय दापका – निलंगा येथील 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत इ. 5 वी त शिकणारे 1) कावाले अदित्य युवराज 2) सोनकांबळे उत्कर्षा दिपक 3) शिंदखेडे राम कोंडल 4) गेंदेवाड संस्कृती कृष्णाजी 5) इबत्ते सानिका सचिन 6) शिंदेदे श्रेया प्रदिप तसेच 8 वी मध्ये शिकणारे 1) गडीकर मोनिका दयानंद 2) सूर्यवंशी दर्शना बालाजी या विध्यार्थाना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तरी सर्व शिष्यवृत्ती धारक विद्याथ्र्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मु.अ./प्राचार्य डॉ. राजेश्वर पाटील, उपप्राचार्य सुधाकर बिराजदार, पर्यवेक्षक डी. एल. पवार व तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.