नांदेड:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्यानंतर काही महिन्यांनी म्हणाले की, देशातून काळा पैसा निघाला नाही तर मला फासावर लटकवा. काय त्यांचे इमोशन, काय ते शब्द नंतर अश्रूही निघाले. त्यांचीही तपस्या आहे पण अश्रूवाली तपस्या आहे, असा टोला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना लगावला.
काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे. आज नांदेड येथे राहुल गांधींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी सभेला संबोधन केले.
हे पहिल्यांदाच घडले
राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी, चुकीची जीएसटी, पाच वेगवेगळे कर, स्वतंत्र भारतात शेतकरी, त्यांचे अवजार, खतांवर कर लागला. विरोधक म्हणतात, ऐवढे पायी चालत आहेत काहीही फरक पडणार नाही. पण मी म्हणतो ही गोष्ट सहज आहे, चालणे सोपे आहे, मी थकत नाही. कारण शेतकरी, मजूर, कष्टकऱ्यांची शक्ती माझ्यामागे आहे.
राहुल गांधी म्हणाले, भारत देश तपस्वींचा आहे, महापुरुषांसमोर आपण हात जोडतो ते त्यांच्या कार्यामुळे तपस्येमुळेच. या देशातील शेतकरीही तपस्या करतो, सर्व वर्ग तपस्या करतो पण त्यांना फळ मिळत नाही. ते मेले तरीही त्यांना फळ मिळत नाही ही खंत आहे.
रोजगार नष्ट झाले
राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीमुळे सर्वसामान्यजन त्रस्त झाले. काळे धन उलट वाढले आहे, शेतकरी त्रस्त आहेत. रोजगार हातातून गेले. महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब झाले. तसेच तुम्हाला आश्वासन दिलेले पंधरा लाखही गायब झाले. भाजपच्या पाॅलिसीमुळे भय उत्पन्न होते.
यात्रा रोखू शकत नाही
राहुल गांधी म्हणाले, मनरेगा बंद करू असे सांगताच शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मनात भय उत्पन्न होते. या भयाला नरेंद्र मोदी आणि भाजप द्वेषात बदलतात. भय आणि द्वेषाविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली. कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत 3600 किमी पायी चालत आहोत. कुणालाही विचार कष्ट होत नाही. मला लोकांकडून आनंद, प्रेम मिळत असून खूप गोष्टी शिकायला मिळत आहे. माझी यात्रा कुणी रोखू शकत नाही.

राष्ट्रवादीचे नेते सहभागी
नांदेड येथील देगलूरनाका येथे भारत जोडो यात्रेत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले. यात्रेत सुप्रिया सुळे यांनी एका युवतीसोबत स्वःत सेल्फीही घेतली.
महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे हेही आज सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. आज राहुल गांधींची सभा हे यात्रेतील आकर्षण आहे.
अभूतपूर्व गर्दी अन् उत्साह
भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील याही चालताना पाहायला मिळाल्या आहेत. बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते असो की, शेतकरी सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत.
लहान मुले, महिलांशी संवाद
भारत जोडो यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात आली, त्यादिवशी रात्री राहुल गांधी म्हणाले होते की, मी दिवसांतील सात तास मी लोकांचे ऐकतो आणि त्या प्रश्नावर मी अर्धातास रात्री बोलतो. महागाई आणि बेरोजगारीवर राहुल भर देत आहेत. या महिला आणि लहान मुलांशी राहुल गांधी यांनी संवाद साधताना दिसत आहेत.

आदित्य ठाकरे सहभागी होणार
महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे हेही आज सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. आज राहुल गांधींची सभा हे यात्रेतील आकर्षण आहे.