• Mon. Aug 18th, 2025

उद्धव ठाकरेंचा मातोश्रीच्या बैठकीत प्लॅन

Byjantaadmin

Aug 18, 2023

मुंबई : केंद्रातील भाजपचा पराभव करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे हे करत असताना काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा, अशी सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केल्याचे समजते. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव आपल्याला करायचा असून त्यासाठी जोरदार कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून ते या ४८ मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे याचा आढावा उद्धव यांनी यावेळी घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस उपस्थित असणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथप्रमुख त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून संघटनात्मक ताकद वाढवा, असेही ते म्हणाले.

uddhav thackeray Says Contesting the Lok Sabha elections we have to compromise on some seats

आघाडीचा उमेदवार कोणीही असो…

अहमदनगर लोकसभा आपल्याला जिंकायचीच आहे, असा निर्धार यावेळी उद्धव यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत व्यक्त केला. आपल्याला सुजय विखे पाटील यांचा पराभव करायचा आहे. त्या तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढायला हव्यात याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो, आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे आणि त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे, असेही उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना सांगिलते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *