बीड येथील सभेतून शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. “माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं. ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे. पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे जर केलं नाही तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तर राज्यात देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात असलेल्या रुग्णालयात लोकांचे जीव गेलं. लोकांना रुग्णालयात गेल्यावर त्यांना आधार मिळाले पाहिजे. पण सरकार यावर बघ्याची भूमिका घेत असल्याचे शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकारवर देखील पवार यांनी टीका केली आहे. “समाजात अंतर निर्माण होईल याची खबरदारी आजच्या राज्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. खतांची किंमत वाढली आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. स्त्रियांची धिंड काढली जात आहे, पण भाजप गप्प आहे. मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी जायची गरज होती. अधिवेशनात अविश्वास ठराव आल्यावर ते शेवटच्या काही मिनटात बोलले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना आवरायची वेळ आली आहे,” असे शरद पवार म्हणाले.
आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण, काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून टाकण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही. ते करायला आमचे लोक तयार झाल्याशिवय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष शरद पवार यांनी नेमका कोणाला दिला असा सवाल उपस्थित होत आहे. महराष्ट्रात आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत होते. त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य जनता अस्वस्थ होते. त्यावेळी बीडचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका घेतली की, नेत्याच्या निष्ठेच्या संदर्भात मी तडजोड करणार नाही. त्याला पडेल ते करावं लागलं, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण मी भूमिकेपासून मागे हटणार नाही, अशी भूमिका केशरकाकूंनी घेतली होती. तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे, असे पवार यांनी नमूद केले. पवार म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधकांची सरकारं उलथवून टाकता. त्यातून सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त केली जात आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली, ते लोक योग्य पद्धतीने वागत नाहीत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात १८ लोकांचे जीव गेले. जखमींना आधार देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर असताना त्याच रुग्णालयांत लोक मृत्युमुखी पडतात. त्याबाबत राज्य सरकार बघ्याचे भूमिका घेते, हे राज्य कसे चालेले आहे आणि कुठे चालेले आहे. हे आपण सर्वजण बघत आहोत.