दिव्यांगाच्या सहवासात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूरचा उपक्रम
लातूर/प्रतिनिधीः- शाररिक व्यंग आणि अपंगत्व यामुळे दिव्यांगाच्या जगण्यावर मर्यादा येत असतात. मात्र या दिव्यांगांना सर्वसामान्यासारखेच आपल्यामध्ये सामावून घेत त्याच्यासोबत विविध कार्यक्रम आणि उत्सव साजरे केल्यास त्या दिव्यांगाच्या जीवनात आनंदाची पहाट उगवते. त्या अनुषंगानेच इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूरच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव दिव्यांगाच्या सहवासात साजरा करण्यात आला. इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूर क्लबच्या अध्यक्षा श्रीमती आरोही बुलानी यांच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात हा उपक्रम साजरा करताना क्लबच्या वतीने दिव्यांगासाठी मिष्टांन्नाची मेजवानी देण्यात आली.
इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूरच्या वतीने विविध सामाजिक आणि समाजउपयोगी कार्यक्रम व उपक्रम घेण्यात येतात. समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी क्लबच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम घेऊन त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होतो. क्लबच्या अध्यक्षा श्रीमती आरोही बुलानी यांच्या संकल्पनेतून दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्स साधत दिव्यांग विद्यार्थ्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आलेला होता. लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यासोबत इनरव्हिल क्लबच्या सदस्यांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला. सकाळपासूनच क्लबच्या सदस्यांनी दिव्यांगासोबत राहून त्यांच्या दिवसभरातील वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे या दिव्यांगांना त्यांच्या व्यंगाची कोणतीही जाणीव होऊ न देता त्यांच्यासोबत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करीत असताना इनरव्हिल क्लबच्या सदस्यांनी त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धाही आयोजित केली होती. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यालयातील 90 दिव्यांगाना मिष्टांन्नाची मेजवानीही देण्यात आली.
विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्लबच्या सदस्यासोबत आपला दिवस मजेत आणि वेगवेगळे खेळ खेळून घालविला. दिव्यांगासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसही देण्यात आले. इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूरच्या या उपक्रमात अध्यक्षा श्रीमती आरोही बुलानी यांच्यासह सचिव वैष्णवी जोशी, कोषाध्यक्ष स्वर्णिमा कोचेटा, संपादक दुर्गा शर्मा, सुषमा खंडेलवाल, प्राची कोचेटा, मिष्टी कटारीया आणि गिता पाटील यांच्यासह इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूरच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.
दिव्यांगाच्या सहवासात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव इनरव्हिल क्लब ऑफ एरिया 24 लातूरचा उपक्रम
