• Sun. Aug 17th, 2025

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना, ट्रकचा भीषण अपघात दोघे जागीच ठार

Byjantaadmin

Aug 17, 2023

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना, मांजरखेडजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला असून, दोघे जागीच ठार झाले आहेत. भरधाव ट्रक सिमेंटच्या कठड्याला धडकल्याने हा अपघात घडला. मोहम्मद फैजान मोहम्मद अली आणि क्लिनर मोहम्मद मुमताज मोहम्मद शेख अशी अपघाताती मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. मुंबईच्या दिशेने जात असताना ट्रकला अपघात झाला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्ात घेतले. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.

Amaravati Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना, मांजरखेडजवळ ट्रकचा भीषण अपघात

डुलकी लागली अन् घात झाला

अपघातग्रस्त ट्रक नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरुन चालला होता. यावेळी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेडजवळ मध्यरात्रीच्या चालकाला डुलकी आली आणि ट्रक सिमेंटच्या कठड्यावर आदळला. यामुळे भीषण अपघात होऊन चालक आणि वाहक दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर मूळगावी पाठवले

घटनास्थळाचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या मूळगावी बिहार येथे पाठवण्यात आले. पुढील तपास ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात तळेगाव पोलीस करीत आहे. सदर समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र थांबण्यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *