• Sun. Aug 17th, 2025

महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचना

Byjantaadmin

Aug 17, 2023

लातूर शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतील वेळापत्रक पाळावे, अनियमित, अवैध बांधकामावर पाय बंद घालावा, वाहतुकीला शिस्त लावा

महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचना

•फुटपाथ, सर्विस रोडवरील अतिक्रमणे दूर करावीत
•साथी रोग पसरणार नाहीत यासाठी फवारणी व आवश्यक उपाययोजना कराव्यात
•शहरातील वीजपुरवठा तसेच स्ट्रीट लाईट नियमित सुरू ठकेवावी
•जाहिरातीचे सेंटर पोल सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच उभारावेत
•दर्जेदार काम न करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीस काळ्या यादीत टाकाव्यात
•अधिकारी, कर्मचारी यांनी कुठल्याही दबावात काम करू नये
•जुन्या गावभागातील पाणी पुरवठा पाईपलाईन बदलून घ्यावी

लातूर (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट २०२३: लातूर शहरातील स्वच्छता व साफसफाईवर लक्ष केंद्रीत करावे बिघडलेल्या कचरा व्यवस्थापनाला शीस्त लावावी, अनियमीत, अवैध बांधकामावर नियंत्रण आणावे, फुटपाथ व सर्व्हीसरोडवरील अतिक्रमणे दूर करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी आदी सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महानगरपालीका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या आहेत. गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी ११ वाजता आमदार अमित देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह, लातूर येथे लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे व सर्व विभाग प्रमुखांसमवेत शहरातील मूलभूत सोयी सुविधा तसेच विविध विकास योजनांमधील प्रगती संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा, लाईट व्यवस्था या संदर्भाने महत्वपूर्ण सुचना करून त्यावर गाभीर्यपूर्वक अमंलबजावणी करण्यास सांगीतले. या प्रसंगी झालेल्या बैठकीत आमदार देशमुख महणाले की, लातूर शहरात मागच्या काही महीन्यात कचरा व्यवस्थापनातील शिस्त बिघडल्या संदर्भात तक्रारी येत आहेत. वृत्तपत्रातूनही या संदर्भात वस्तुस्थिती मांडली जात आहे. नियमीत घंटा गाडी फिरत नसल्याने रस्त्याच्या कडेला व मोकळया जागेत कचऱ्याचे ढिग जमा होत आहेत. नियमीत नालेसफाई होत नसल्याने त्या तुंबल्या आहेत. अस्वच्छतेमूळक रोगराई पसरण्याची भिंती निर्माण झाली आहे. शहरातील अस्वच्छतेची बाब गंभीर असून त्यात तातडीने सुधारण होणे गरजेचे आहे असे आमदार देशमुख यांनी सागितले.शहर स्वच्छते बरोबरच अवैध आणि अनियमित बांधकामावर कार्यवाही करावी, बांधकाम परवान्याप्रमाणेच बांधकाम होईल याची दक्षता घ्यावी. फुटपाथ, सर्विस रोडवरील अतिक्रमणे दूर करावीत. शहरातील
वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी. साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी फवारणी व इतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. शहरातील वीजपुरवठा तसेच स्ट्रीट लाईट नियमित सुरू राहील यासाठी व्यवस्था उभारावी. जाहिरातीसाठी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात येत असलेले सेंटर पोल धोकेदायक ठरू नयेत यासाठी सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच उभारावेत. नियमानुसार आणि दर्जेदार काम न करणाऱ्या कंत्राटदार एजन्सी काळ्या यादीत टाकाव्यात. जुन्या गावभागातील पाईपलाईन बदलून घ्यावी. संपूर्ण शहरात पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. शहरात सुरू असलेले विकास प्रकल्पmदर्जेदार पद्धतीने आणि जलद गतीने पूर्णत्वास न्यावेत, अधिकारी, कर्मचारी यांनी कुठल्याही दबावात काम करू नये. असे सांगून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना कार्यमुक्त करावे, अशीही सुचना या बैठकी दरम्यान आमदार देशमुख यांनी केली आहे. या बैठकीस अतिरीक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपायुक्त मयुरा शिंदीकर, प्रादेशिक परीवहन अधिकारी विजय भोये, शहर वाहतुक पोलीस निरीक्षक गणेश कदम, विणा पवार, नगररचनाकार निकीता भांगे, सहायक आयुक्त मजुषा गुरमे, क्षेत्रीय अधिकारी बडू किसवे, कलीम शेख, समाधान सुर्यवंशी, विजय राजूरे, पाणी पुरवठा अभियंता विजय चव्हाण, शहर अभियंता नवनाथ केंद्रे, डॉ. महेश पाटील, रमाकांत पिडगे, रूकमानंद वडगावे, जरीचंद ताकपीरे, बालाजी रूपनर, रवी कांबळे, लक्ष्मण जाधव, सतिश टेकाळे, देवडे, खदीर शेख, कोळगणे, समद शेख, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *