स्वतंत्र नगर परिषद द्या मागणी!
निलंगा ( प्रतिनिधी):- निलंगा येथील मूळ जुन्या शहरातील औरंगपुरा,जामबाग,जुने पोलीस स्टेशन,जुनी पेठ,पिरपाशा दर्गा,माळी गल्ली,खिंडी गल्ली,काजी गल्ली,छोटी मस्जिद,बागवान गल्ली,खाटीक गल्ली,माँ चांदसाबी मोहल्ला,अण्णाभाऊ साठे नगर,वीर लहुजी साळवे नगर भागात निधी वाटपात दुजाभाव केला गेला असून मूलभूत सुविधाही पुरवण्यात नगपालिका असमर्थ ठरली आहे.जुने शहरात राहणारे नागरिक निलंग्यातील रहेवाशी नाहीत का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र नगरपालिका द्या अशा मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस व नागरिकांतर्फे उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना केले आहे.
निलंगा येथील कासार सिरसी अप्पर तहसीलचा वाद पेटलेला असताना आता निलंगा शहरातील जुन्या विविध भागात निधी व मूलभूत सुविधा देण्यास नगर पालिका असमर्थ ठरली असून 24 तास पाणी म्हणून एक दिवसाड पाणीही ते ही मुबलक प्रमाणात मिळत नसून त्यात ही नगर पालिके कडे वीज बिल भरले जात नाही म्हणून सतत विज कनेक्शन तोडले जात आहे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो,शहरातील चालू असलेले बोर बंद करून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात आली आहे.
सध्या निलंगा शहराची वाढती लोकसंख्या पाहता आम्हाला स्वतंत्र नगरपालिका द्या. अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेस व नागरिकांतर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे .
सदरील निवेदनावर विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे,तालुका अध्यक्ष मदन बिरादार,शहर अध्यक्ष मुजीब सौदागर,तुराब बागवान,सबदर,काद्री,आवेज शेख,धनाजी चांदुरे,खय्यूम बागवान, पाशा बागवान,गिरीश पात्रे, अजय कांबळे,महेमूद शेख, साजन शिंदे,इब्राहिम बिबराले बिलाल शेख,तुषार सोमवंशी,खुर्रम सय्यद,मुनीर खतीब,वसीम सय्यद,विशाल बिरादार,सोहेल शेख,विष्णू बिरादार ,बाबा बिबराले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत