स्वाभिमानी महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकून स्वार्थासाठी दिल्लीत मुजरे करणाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा निवडून येऊ देणार नाही-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेनेचे नेते मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाणव औसा तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लातूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज नदीहातरगा तालुका निलंगा येथे नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेना ही नेहमी 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारणाचा भाग घेऊन काम करते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी पाठीशी घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य माणसावर होणारे अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन या महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्राच्या विधानसभेवर दोनदा भगवा फडकवला बघता बघता महाराष्ट्र शिवसेनामय झाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले जे निर्णय होते ते लोकापर्यंत पोहोचले आणि स्तुत्य असे निर्णय घेत असताना मुख्यमंत्री याचा लौकिक वाढला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच पहिल्या दोन-तीन मुख्यमंत्री मध्ये असायचे सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले निर्णय घेतले परंतु भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार ई. डी , सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थेला हाताशी धरून महाराष्ट्रातल्या लोकशाही वर आघात केला एकनाथ शिंदे सोबत चाळीस आमदार फुटून गेले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना राजीनामा द्यावा लागला परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात झालेली काम नियोजन कोरोना पासून महाराष्ट्र माझं कुटुंब समजून प्रत्येक कुटुंबाची सुरक्षितता याला प्राधान्य देऊन केलेल्या कामाचा गौरव संपूर्ण देशांनी केला. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून काही गद्दारांनी केलेली गद्दारी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.
स्वाभिमानी महाराष्ट्राला दिल्लीच्या चरणी झुकवण्याचं काम सध्याचे महाराष्ट्रातलं सरकार करत आहे. म्हणून स्वाभिमानी महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी कणखर देशा, महाराष्ट्र देशा मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी साठी महाराष्ट्रातली जनता निश्चित स्वरूपाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे उभी असून कोणत्याही प्रसंगी निवडणुका लागू द्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा विजय होणारच .यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने कंबर कसलेली आहे. परंतु सध्याच्या सरकारला केंद्र सरकारला या गोष्टीची भीती असल्यामुळे कुठल्याही निवडणुका घेत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मराठवाड्या मधल्या एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात आहेत हा अवहाल मराठवाडा विभागीय माजी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेला आहे. यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे टाकण्याचा आदेश दिलेला असून आज आम्ही सर्व पदाधिकारी शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं देणं लागतो या भावनेतून सदरील शिबिराचा आयोजन करण्यात आलेला आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख यांनी प्रयत्न करावे असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, उपतालुकाप्रमुख अर्जुन नेलवाड, पंचायत समिती प्रमुख बालाजी मोहिते, रतन मनाळे, लक्ष्मण पाटील, खंडू मनाळे, सिद्धेश्वर इंगळे तसेच नदिहत्तरगा या गावातील बालाजी तिप्पणबोने व्यंकट टिपणबोने सचिन पाटील हर्षवर्धन कांबळे गुंडप्पा तीपणबोने महबूब शेख बालाजी कोकरे उमेश ती पणबोने दत्ता हजारे किरण पाटील महेश धाप्पा धुळे सुनील शिंदे इस्माईल शेख गावचे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.