मराठा सेवा संघाचा विचार घराघरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करा -पुरुषोत्तम खेडेकर
निलंगा(प्रतिनिधी):-मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा मराठा जनसंवाद दौरा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे त्या अनुषंगाने निलंगा येथे आले असता ते बोलत होते, मराठा सेवा संघाचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांना दिला,मराठा सेवा संघाच्यामाध्यमातून गेली तीस वर्षे झाले समाजप्रबोधन सुरू आहे शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी मराठा सेवा संघाची वाटचाल सुरू या प्रबोधनातून अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय बदल महाराष्ट्रात घडले असून सेवा संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सेवा संघाने पंचसूत्री च्या माध्यमातून मोठे सामजिक कार्य उभे केले आहे ते कार्य आणि विचार जनसामान्यांन पर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे असे ते बोलत होते,महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना शह देण्यासाठी मनोहर भिडे सारख्या व्यक्तीचा राजकीय लोक वापर करत असून या विचारांपासून समाजाने दूर राहिले पाहिजे व अश्या विकृत व्यक्तींना थारा देऊ नये असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.नवीन पिढीने शिक्षण उद्योग व्यवसाय साहित्य यात पुढाकार घेऊन आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच कुटुंबाचा व समाजाचा विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.सूत्रसंचालन सतिष हानेगावे यांनी केले प्रस्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम एम जाधव तर आभार डी. बी. बरमदे यांनी मानले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे,शारदा जाधव,प्रा.गणेश बेळंबे,इंजि. मोहन घोरपडे, विनोद सोनवणे, डॉ. उद्धव जाधव,आर.के. नेलवाडे, कुमोद लोभे,अर्चना जाधव, नम्रता हाडोळे, प्रमोद कदम, डी. एन. बरमदे, बाळासाहेब बिराजदार, संभाजी क्षीरसागर, हरिभाऊ सगरे, प्रशांत वांजरवाडे,बालाजी जाधव, राजन साळुंके, सुबोध गाडीवान,कुलदीप सूर्यवंशी, बंटी देशमुख,महेश जाधव,प्रदीप सावरे आदी उपस्थित होते.