• Sun. Aug 17th, 2025
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

पुणे : मागील महिन्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली  आहे. राज्यात अनेक शहरात पावसाची प्रतीक्षा आहे. जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला. ज्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला. मात्रऑगस्टमध्ये पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. तब्बल 51 वर्षांनी पावसाने एवढा मोठा ब्रेक घेतल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

यापूर्वी 1972 मध्ये 18  जुलै ते 3 ऑगस्ट इतका ब्रेक बघायला मिळाला होता. मान्सून ब्रेक हे सर्वसाधारण आहेत. सध्या 8 ते 10 दिवसांचा ब्रेक पाऊस घेत आहे. मान्सूनमध्ये असे ब्रेक येत असतात आणि ते शेतीसाठी गरजेचे असतात. पण यावेळेस पाऊसच कमी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटणे साहजिक असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मान्सूनची आकडेवारीत मोठा फरक जाणवला आहे. यापूढे पावसाची काही प्रमाणात शक्यता आहे. हा ड्राय स्पेल सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात बघायला मिळेल. 18 ऑगस्टनंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 19 आणि 20 ऑगस्टला विदर्भात  काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगलच्या उपसागरात ढग बघायला मिळत आहे. हे ढग उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकताना दिसतायत. ज्याचा परिणाम 3-4 दिवसांनी विदर्भात बघायला मिळेल. मात्र मध्य महाराष्ट्रात ब्रेक कायम राहणार आहे. बंगालच्या खाडीत होत असलेल्या बदलांचा परिणाम आपल्याला मध्य महाराष्ट्रात दिसणार नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. राज्यात मागील काही दिवसात कोणत्याच शहरात हवा तसा पाऊस पडला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंही यंदा पावसाचं प्रमाण कमीच आहे. अल निनो आणि इतर काही भौगोलिक बदलांमुळे पावसाची सरासरी घसरली आहे. PUNE, नाशिक आणि राज्यातील इकर शहरात खरंतर पावसाची मोठी गरज आहे. शेतीची कामं आणि पाणी साठ्यासाठी पाऊस पडण्याची गरज आहे. राज्यातील धरणात वर्शभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला नाही आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाऊस पडणं आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा पाऊस पाणीसाठा भरुन काढण्यासाठी पुरेसा ठरतो का?,  हे पाहणं महत्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *