राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतील एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. भाजप समाजात तेढ निर्माण करतो, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय जनता पक्षावरही टीका केली. ते म्हणाले की,”भाजपची भूमिका समाजविरोधी आणि तेढ निर्माण करणारी आहे. समाजात कटुता कशी वाढेल हीचं भाजपची भूमिका आहे. ”
शरद पवार राष्ट्रीय स्तरावर दोन मोठ्या सभा घेणार आहेत. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, “मोदी आणि भाजप विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करु. “राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रभर पक्षबांधणीची घोषणा केली होती. त्याला अनुसरुन त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घ्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत भेट झाली होती ही गोष्ट मान्य केली.
रद पवारांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरुन भाजपाला टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी निर्णय घेते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले.ठाकरे गटाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला होता, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटासोबत जे चिन्हाबाबत झालं, ते आमच्यासोबतही होऊ शकतं, असंही मत त्यांनी नोंदवलं. त्यांच्या बोलण्यातून केंद्रीय संस्थावरील अविश्वास स्पष्ट झळकत होता.यावेळी त्यांनी २०२४च्या निवडणूकीचं भाकीतंही वर्तवलं. त्यांनी दावा केला की २०२४मधील निवडणूक भाजपसाठी अनुकूल नाही. अनेक राज्यांमध्ये सरकार पाडून भाजप सत्तेत आलंय, असेही ते म्हणाले.पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली असून आज ते छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ ते संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली. त्याचबरोबर मला माझ्या पक्षात फूट झाली तर चिन्हाची चिंता नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.