नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाने उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. आता निवडणूक आयोगाने ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.दरम्यान अजित पवार यांच्या गटाने कोणती कागदपत्र दिली आहेत, त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल असा मेल शरद पवार गटाने केला होता. पण त्याला निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर आलं नव्हते. त्यानंतर शरद पवार गटाने पुन्हा 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता.दरम्यान निवडणूक आयोगाने उत्तर दाखल करण्यासाठी शरद पवार गटाला ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे.निवडणूक आयोगाने (उद्या) गुरुवारपर्यंत दोन्ही गटांना उत्तर सादर करायची मुदत दिलेली होती.