गत हंगामातील उत्पादीत अश्वगंधाचे पूजन आणि विक्रमी अश्वगंधा उत्पादक शेतकऱ्यांचा टवेटीवन ॲग्री ली.च्या संचालीका सौ. आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार
लातूर (प्रतिनिधी): टवेटीवन ॲग्री व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून गत हंगामात लागवड केलेल्या अश्वगंधा पासून उत्पादीत झालेल्या अश्वगंधाचे पूजन टवेटीवन ॲग्री ली. च्या संचालीका सौ. आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या लागवड मोहीमेत सहभाग घेऊन अश्वगंधा वनस्पतीची लागवड करून सर्वांधीक दर्जेदार अश्वगंधाचे उत्पन्न घेणाऱ्या ११ अश्वगंधा उत्पादक शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन ॲग्रीच्या संयुक्त विद्यमाने
शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती, सुगंधी वनस्पती शेतीकडे कल वाढवून लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांना उत्पान्नाचा एक स्त्रोत मिळवून देण्यासाठी टवेटीवन ॲग्री ली. च्या संचालीका सौ. आदिती अमित देशमुख यांनी पूढाकार घेतला आहे. या अंतर्गत गतवर्षी अश्वगंधा लागवड मोहीमेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार टवेटीवन ॲग्री कार्यालय, लातूर येथे करण्यात आला. विशेष म्हणजे शेती करतांना शेती मशागत आणि नियोजनात मोठा सहभाग स्त्रीयांचा असतो याकरीता सर्वांधीक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये चलवाड विठ्ठल रा. सारोळा, सिंगापुरे ज्ञानोबा, रा. सेलू, खंडागळे शिवदास रा. कासारखेडा, कदम संपत रा. मांजरी, पंडगे नागनाथ रा. सेलू, कांबळे बंकट रा.सेलू, श्याम गरड रा. मुरुड, सापसोड ज्ञानोबा रा. मुरुड, मोरे चंद्रकांत रा. मुरुड, शिंदे बापू रा. बोरगाव, राजाभाऊ रा. निवळी या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रम प्रसंगी सेंद्रिय शेतीसाठी उपयोगी असलेले सेंद्रिय कीट यामध्ये सेंद्रिय कीटकनाशक, टॉनिक, ह्युमिक ऍसिड, सूक्ष्म अन्नद्रव्ये व स्टिकर याचा समावेश आहे, तसेच विलासराव देशमुख फाऊडेशनच्या वतीने वृक्ष भेट देऊन शेतकऱ्यांचा सत्कार टवेटीवन ॲग्री ली. च्या संचालीका सौ. आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास धनंजय राऊत, श्रीमती संगीता मोळवणे, कर्मचारी अविनाश कळसे, विजयकुमार मस्के, नवनाथ जाधव, पुंडलिक गव्हाने, तुषार जाधव, मनोज गायकवाड, आकाश सवासे, सुरेंद्र गिरी, गजानन बोयने, आदी उपस्थित होते.
—