निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा
निलंगा- भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष फारूक देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर काँग्रेस कार्यालयामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर यांच्या वतीने निलंगा शहरातील दै. लोकमतचे पत्रकार संजय इंगळे व दै. पुण्यनगरीचे पत्रकार परमेश्वर शिंदे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान केल्याबद्दल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी निलंगा शहरातील जेष्ठ विधीतज्ञ राजकुमार कांतराव कुलकर्णी व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे फिल्ड ऑफिसर व्यंकटराव शिंदे यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमानंतर अशोकराव पाटील म्हणाले की,पत्रकारीता क्षेत्रामध्ये निपक्ष पत्रकारिता करून समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम करावे.समाजातील सामान्य माणूस आपल्या लेखणीला आदरयुक्त पद्धतीने पाहत आहे.सध्याच्या इलेट्रॉनिक मीडियाला समाज वेगळ्या पद्धतीने पाहतो.परंतु प्रिंट मीडियाला आत्मविश्वासाने पाहतो.याची जाणीव आपण ठेवावी.असे ते म्हणाले तर सेवानिवृत्त व्यंकटराव शिंदे व ऍड.कुळकर्णी यांनी सामाजिक कार्याबरोबर काँग्रेसच्या मजबुतीसाठी सक्रिय होऊन सहभाग नोंदवावा.
यावेळी निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, जेष्ठ विधिज्ञ जगदीश सूर्यवंशी,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल सोनकांबळे, प्रदेश काँगेसचे सदस्य मोहंमदखान पठाण,माजी उपाध्यक्ष शेषेराव कांबळे, मा.नगरसेवक अशोक शेटकार,निलंगा काँग्रेसचे प्रवक्ते पुरूषोत्तम कुलकर्णी, मा.नगराध्यक्ष हमीद शेख, मा.सभापती अजित माने,महेश चिकराळे,सोशल मीडियाचे महादू झरकर,नगरसेवक सुधीर लखनगावे, निलंगा ता.अल्पसंख्याक अध्यक्ष लाला पटेल,मा.नगरसेवक दादाराव जाधव,ऍड.तिरुपती शिंदे,विक्रांत सूर्यवंशी,उसनाळे तात्या,कुंभार गुरुजी,संभाजी ब्रिगेड चे प्रमोद कदम,गोविंद सूर्यवंशी, संतोष नाईकवाडे,रोहन सुरवसे,शहराध्यक्ष मुजीब सौदागर,नागनाथ घोलप,अजय कांबळे, सिद्धू आवळे, चांद कुरेशी,सोहेल शेख,ज्ञानेश्वर वाडीकर,रामलिंग पटसाळगे,वंचित चे सुनील सूर्यवंशी,अनिल अग्रवाल,मुश्ताक देशमुख, तुषार सोमवंशी,बालाजी कांबळे, दीपक नाईक,अजय शिंदे,भवानी नाईकवाडे,जनार्धन चव्हाण,बालाजी कांबळे,तुराब बागवान,इ शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.