उमरगा(हा)येथे शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या स्मारकास जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे अभिवादन
निलंगा/प्रतिनिधी निलंगा शहरालगत असणाऱ्या मौजे उमरगा हा येथील शहीद जवान नागनाथ लोभे व श्रीधर चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज त्यांच्या वीर पत्नीचा यथोचित सत्कार करीत अभिवादन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे जगदीश लोभे पंचायत समितीचे माजी सदस्य विलास लोभे भाजपाचे कुमोद लोभे अजित लोभे ग्रामपंचायतचे सरपंच विकास सेवा सोसायटीचे चेअरमन महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक वृंद गावातील ज्येष्ठ नागरिक युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते उमरगा हा येथील भारतीय सैन्यातील वीर जवान नागनाथ लोभे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वीर पत्नी लोभेताई व चव्हाण ताई या दोघींचा सत्कार करून भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या स्वातंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या संसारावर तुळशीपत्र सोडून कच्च्या-बच्चा पोरा बाळाचा कुटुंबाचा विचार न करता त्या आग आणि समर्पणाच्या भावनेतून भारतीय मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांना देशाच्या सीमेवर आजही भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना वीर जवानांना मानवंदना देऊन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आजची परिस्थिती जर पाहिली तर छत्रपती शिवप्रभूंना प्रश्न पडला असेल या थोर स्वातंत्र्यसैनिकांनाही प्रश्न पडला असेल कशाला हवं होतं स्वातंत्र्य आम्हाला कशासाठी घरा दारावर तुळशीपत्र ठेवला आहे काय म्हणून प्राणाची आहुती दिली आम्ही यासाठीच मूठभर लोकांकडून हजारोच शोषण करायला आपल्याच माय माऊलीची इज्जत विश्वर सांगायला आणि म्हणून त्या थोर स्वातंत्र्यसैनिकांचा आत्महत दुखावला असेल छत्रपती शिवरायांचा चेहराही कोमजला असेल की आजच वागणं बघून आजची परिस्थिती बघून या थोर स्वातंत्र्यसैनिकांना प्रश्न पडला असेल का यासाठी स्वातंत्र्य होता आम्हाला परंतु अभिमानाची गोष्ट उमरगावासीयासाठी आहे या गावातील दोन जवान भारत मातेचे संरक्षण करत असताना शहीद झाले नागनाथ अभंग लोभे श्रीधर व्यंकटराव चव्हाण या दोन जवानांनी भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्याही प्राणाची आहुती दिली या गावातल्या तमाम तरुणाच्या मनात भारत मातेबद्दल सैन्याबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे मनामनात चेतना जागली पाहिजे होय मी भारत मातेची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होईल भारत मातेची इमानी द्वारे सेवा करीन हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे तसेच स्वतः शिवाजी माने यांनीही स्वतः सैन्यात असताना सीमेवर संरक्षण करत असतानाची आप बीती कहाणी सांगितले
