लातूर जिल्हा बँकेचे रक्तदान शिबिराचे कार्य कौतुकास्पद
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टी मुळे जिल्ह्याचा कायापालट-माजी आमदार अँड त्रिंबक भिसे यांचे प्रतिपादन
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृति दिनानिमित्त जिल्हा बँकेत ८१ जणांनी केले रक्तदान
लातूर :-राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले असून त्यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्याच्या विकासाचा कायापालट होऊ शकला लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहकारी संस्था राज्यात नावलौकिक झालेल्या दिसत आहेत त्याच पावलावर पाऊल ठेवून राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या वतीने विविध योजना राबवून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असुन सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल बँकेचे कौतुक करत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यासाठी नवीन रक्तदाते तयार होण्याची गरज आहे असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे माजी आमदार अँड त्रिंबक भिसे यांनी व्यक्त केले ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या ११ व्या स्मृतिदिन निमित्ताने आदर्श बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक अँड राजकुमार पाटील संचालक व्यंकटराव बिरादार संचालक अनुप शेळके, संचालक जयेश माने,संचालक दिलीप नागराळकर, संचालक मारोती पांडे, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव राज्य सहकारी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक एस बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
*८१ कर्मचारी अधिकाऱ्यांनी केले रक्तदान*
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आदर्श जिल्हा बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले त्यात ८१ जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला आहे
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माऊली ब्लड बँकेचे डॉ जैस्वाल, डॉ उमाकांत जाधव ,नर्स यांनी सहकार्य केले
कार्यक्रमास बँकेचे उपसरव्यवस्थापक बी व्ही व्ही पवार, आदर्श बँक कर्मचारी संघटनेचे गोविंद कोळपे बालाजी जाधव ,महेश सुर्यवंशी, गट्सचिव संघटनेचे धोंडीराम पौळ, जीवन सुर्यवंशी दीपक गोरे,बँकेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मीडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, आदी उपस्थित होते कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी मांडले सूत्रसंचलन व्ही सी बिराजदार यांनी केले