लोकनेते विकासरत्न विलासरावजी देशमुख साहेब यांना ११ व्या स्मृती दिना निमित्त मांजरा साखर येथे पुष्पांजली
लातूर :-विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना विलासनगर येथे १४ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ठीक८.०० वाजता आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ११ व्या स्मृति दिनानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास कारखान्याचे अध्यक्ष सहकार महर्षि दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष व संचालक, तथा रेणाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आबासाहेब पाटील, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन. अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारूती महाराज कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हा. चेअरमन शाम भोसले, जागृती कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मणराव मोरे, लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदिश बावणे, जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन पृथ्वीराज सिरसाट मांजराचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, संभाजी सुळ, सचिन दाताळ, कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक तात्यासाहेब देशमुख, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे,धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, बाबुराव जाधव, तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, विविध संस्थाचे पदाधिकारी व अधिकारी, तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.