• Thu. Aug 14th, 2025

रेणा साखर कारखाना येथे लोकनेते विलासराव देशमुख  यांच्या पुण्यस्मृती दिन निमित्त स्मृती संग्रहालय स्थळी केले अभिवादन

Byjantaadmin

Aug 14, 2023

रेणा साखर कारखाना येथे लोकनेते विलासराव देशमुख  यांच्या पुण्यस्मृती दिन निमित्त स्मृती संग्रहालय स्थळी केले अभिवादन

सामजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबीरात ५१ बाटल्या संकलन वृक्षारोपण संपन्न

रेणापूर :-राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या ११ व्या स्मृति दिनानिमित्त रेणा साखर कारखाना स्मृति स्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन करुन कारखाना परिसरात वृक्षारोपन व रक्तदान शिबीर घेण्यात आले रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले

रेणा साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे सद्या रक्ताची होत असलेली कमतरता पाहता रक्त पुरवठा गरजुंना वेळेवर उपलब्ध व्हावे तसेच आपली सर्वांची सामाजीक बांधीलकी म्हणुन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे ही काळाजी गरज असल्याने व वृक्षलागवड व जोपासना करणे सर्वांची जबाबदारी आहे व त्याच दृष्टिकोणातून कारखाना स्थळी विविध झांडाचे वृक्षारोपन व 51 बाटल्यांचे रक्तदान करण्यात आले अशी माहिती रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी दिली. तसेच सदरच्या रक्तदान शिबीरास आर्पण ब्लड बँकेचे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेवून मोलाचे सहकार्य केले.

यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे,व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, संचालक लालासाहेब चव्हाण, धनराज देशमुख, प्रविण पाटील, चंद्गकांत सुर्यवंशी शहाजीराव हाके, संजय हरिदास, अनिल कुटवाड, तानाजी कांबळे, पंडीतराव माने, स्नेहलराव देशमुख तक्रार निवारण समिती सदस्य सतीश पाटील कृषी उत्तन्न बाजार समीतीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके, संचालक,प्रवीण माने, विश्वनाथ कागले, प्रकाश सुर्यवंशी, अशोक राठोड, प्रमोद कापसे, राजाभाऊ साळुंके, नागनाथ कराड, कृषी उ.बा.स.चे माजी सभापती रमेश सुर्यवंशी, खरेदी विक्री संघाचे माणिकराव सोमवंशी, रेणापूर पंचायत समितीचे नगरसेवक पद्म पाटील, पत्रकार विठ्ठल कटके यांच्यासह तालुक्यातील गांवचे सरपंच,उपसरपंच, सदस्य सोसायटीचे चेअरमन, सदस्य परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *