• Thu. Aug 14th, 2025

शरद पवारांच्या खेळीने काँग्रेस अलर्टवर; नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंशी एकांतात भेट!

Byjantaadmin

Aug 14, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक सर्वांसमोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यात आता काँग्रेस देखील अलर्ट मोडवर आहे. या संदर्भात आपण राहुल गांधी यांनाही माहिती दिली असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत, त्यांच्याशी एकांतात चर्चा केली. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येतेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि I.N.D.I.A. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या गुप्त भेटीने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वत: शरद पवार यांनीही दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तरी देखील आघाडीमधील पक्षांमध्ये संभ्रम कायम आहे.

या संदर्भात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीविषयी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच हायकमांड देखील यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही संभ्रमात नसून जनतेत संभ्रम आहे. अजित पवार त्यांचे नातेवाईक आहे. पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे हे आघाडीसाठी चिंताजनक असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *