• Thu. Aug 14th, 2025

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैधकिय रूग्णालयात रूग्णांना फळाचे किट वाटप

Byjantaadmin

Aug 14, 2023

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैधकिय रूग्णालयात रूग्णांना फळाचे किट वाटप

लातूर दि. १४. राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आमचे श्रद्धास्थान विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने सोमवारी सकाळी ८ वाजता विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना फळाचे किट वाटप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले

जिल्हा बँकेचा सामाजिक उपक्रम

राज्यात नावलौकिक असणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक उपक्रम म्हणून विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना फळाचे किट वितरण करण्यात आले या किटमध्ये केळी,संत्री मोसंबी, डाळिंब, ॲपल, स्वीट देण्यात आले

यावेळी बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक अँड राजकुमार पाटील संचालक दिलीप पाटील नागराळकर,संचालक जयेश माने, अनुप शेळके,बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव बँकेचे उपसर व्यवस्थापक बी व्ही पवार, जिल्हा बँकेचे मीडिया समन्वयक पत्रकार हरिराम कुलकर्णी, बँकेचे विविध खाते प्रमुख सर्वश्री व्ही सी बिराजदार, जयराज शिंदे, मुळे, जगताप, तसेच विलासराव देशमुख शासकीय वैधकीय रुग्णालयातील डॉक्टर, प्राध्यापक नर्स, उपस्थित होते

रुग्णांना आली विलासराव देशमुख साहेब यांची आठवण

विलासराव देशमुख वैधकिय रूग्णालयात रूग्णांना फळाचे किट वाटप करताना एका रुग्णाला त्यांना फळाचे किट वितरण करण्यात आले तेव्हा विलासराव देशमुख साहेब यांचे चित्र किट वर बघून त्या रुग्णाने साहेबांची आठवण काढून आपल्या भावना व्यक्त केल्या विलासराव देशमुख साहेब हे सर्व जनतेसाठी देव होते त्यांच्या नावाने आज समाज उपयोगी कार्यक्रम करत आहात खूप आनंद वाटला असे त्यांनी सांगीतले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *