बीड : ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणुका लढत होतो, आता तेच लोक दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे आता स्वबळावर निवडणुका लावल्याशिवाय पर्याय नाही असा नारा बीड काँग्रेस चे प्रभारी आमदार अमित देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या आमदारांना मोठा फटका बसणार आहे. हे मात्र निश्चित.
अमित देशमुख यांनी रविवारी काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आपण स्वबळावर सुद्धा मैदानात उतरण्याची तयारी ठेवणार आहोत. बीडची जागा ही काँग्रेसच लढणार असून त्यासाठी सक्षम उमेदवारही असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी म्हंटले आहे. बीडमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीवेळी कार्यकर्त्यांना उद्देशून देशमुख बोलत होते. देशमुख यांच्या या दाव्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संभ्रम असून यापूर्वी बीडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. बीड हा धनंजय मुंडे यांचा मतदार संघ आहे. आता या जागेवर देशमुख यांनी दावा केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.