जागृती शुगर कारखान्यावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती स्थळी अभिवादन
स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न
लातूर दि. १४. राज्यात खाजगी साखर कारखान्यात सर्वाधिक उस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्यावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या वतीने सोमवारी अधिकारी कर्मचारी कामगार यांनी एकत्र येऊन स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी जागृती शुगर चे सरव्यवस्थापक गणेश येवले, चिफ इंजिनिअर अतुल दरेकर ,मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, डेप्युटी चिफ केमिस्ट ज्ञानेश्वर जाधव, डिस्टलरी मॅनेजर विलास पाटील यांच्या सह विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी कामगार मोठया प्रमाणावर उपस्थित होते