जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृति दिनानिमित्त सोमवारी होणार रक्तदान शिबिर
विलासराव देशमुख शासकीय वैधकिय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप होणार
लातूर -राज्यात अग्रेसर असणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्याने टिळक नगर लातूर मुख्यालयात आदर्श जिल्हा बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या रक्तदान शिबिरास सर्वांनी उपस्थित रहावे व सहभाग नोंदवावा असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे.
बँकेच्या वतीने सामजिक उपक्रम म्हणून रुग्णांना फळे वाटप
तत्पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने सोमवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय रुग्णालय व रिसर्च सेंटर लातूर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमास बँकेच्या सन्माननीय संचालक मंडळ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांनी केले आहे