उस्मानाबाद : काँग्रेस पक्षातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या भावनेचा विचार करता आगामी होणार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जाईल. तसा ठराव उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला असून प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नावाची शिफारस उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने ठरावाद्वारे प्रदेश कमिटीकडे केली आहे. या वर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी उस्मानाबाद येथे केलंय.
उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविदयालयाला मंजुरी महाविकास आघाडीच्या काळात मिळाली आहे. तसेच उस्मानाबाद – तुळजापुर – सोलापूर रेल्वेसाठी महाविकास आघाडीने पाठपुरावा केला होता. निधी उपलब्ध करुन दिला होता. कृष्णा खोऱ्यातील २१ टिएमसी पाणी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुखयांनी मंजुर केले होते. यासाठी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.उस्मानाबाद येथील वैदयकिय महाविदयालय, उस्मानाबाद – तुळजापुर रेल्वे, कृष्णा खोऱ्यातील २१ टिएमसी पाणी भाजपाने मंजूर केलंय. याचे श्रेय भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.आमदार अमित देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता उस्मानाबादच्या राजकारणाला नवा ट्विस्ट येणार आहे.