बाजार समितीच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त भास्करराव पेरे यांचे व्याख्यान
लातूर -लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या ११ व्या स्मृतिदिन निमित्ताने लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता दगडोजीराव (दादा) देशमुख स्मृती भवन मार्केट यार्ड सभागृहात आदर्श गाव पाटोद्याचे जनक भास्करराव पेरे पाटील यांचे जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील , जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे , विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, यांची उपस्थिती राहणार आहे
या जाहीर व्याख्यान कार्यक्रमास तालुक्यांतील शेतकरी, नागरिक बाजार समितीच्या घटकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनिल पडीले,संचालक आनंद पाटील, तुकाराम गोडसे, अँड लक्ष्मण पाटील, आनंद पवार, अँड युवराज जाधव, श्रीनिवास शेळके, सौ लतिका देशमुख, सौ सुरेखा पाटील, सुभाष घोडके, शिवाजी देशमुख, अनिल पाटील, बालाजी वाघमारे, सचिन सूर्यवंशी, बालासाहेब बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे बाजार समितीचे सचिव भगवान दुधाटे यांनी केले आहे