निलंगा ( प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा मी संदेश घेऊन आलो आहे . देशात परिवर्तन घडले पाहिजे . सर्वोच्च न्यायालयानेही हात टेकले असून लोकशाहीची विटंबना होत आहे . तरी या विटंबनेचे आपण भागीदार होऊ नये असे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले .
ते आज दि 11 ऑगस्ट रोजी येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित निलंगा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व धोंडे जेवण कार्यक्रमात बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके , जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे , काँग्रेसचे निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील , शिरूर आनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर , देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुने, मल्लिकार्जुन मानकरी , ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख , डॉ अरविंद भातांब्रे , अजित माने , भगवानराव पाटील विजयनगरकर, हमीद शेख ,चक्रधर शेळके , पंकज शेळके , सुधाकर पाटील , राजेंद्र सूर्यवंशी , लाला पटेल , शिवसेनेचे अविनाश रेशमे , अमित मानकरी , सचिन दाताळ , रामभाऊ भंडारे , सुरेंद्र धुमाळ , महेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .
पुढे बोलतांना माजीमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की , भारतीय संस्कृती मध्ये धोंडे जेवण कार्यक्रमाला अनन्य महत्व आहे . धोंडे जेवणाचे महत्व सांगत या आयोजित धोंडे जेवण कार्यक्रमाचा जावाई कोण ? रस्त्याने येत असताना मी विचार करत होते या कार्यक्रमाचा जावाई मी तर नाही ना असा मिशकील सवाल केले .लातूरच्या राजकारणात देशमुख विरुद्ध निलंगेकर असे नेहमीच समीकरण मानले जाते .मात्र आमच्यात कसलाच वाद नसून निलांग्यातील खालचा वाडा वरचा वाडा खालून एकमेकाला जोडलेला असू नये असे म्हणत आम्हाला खालचा वाडा व एक टॉकीज एवढेच माहीत आहे . म्हणूनच येथील कार्यक्रमाला निलंग्यात पत्रकार असतानाही लातूरचे पत्रकार खमंग बातमीच्या शोधात निलंग्याला हजेरी लावतात . धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा दाखला देत आगामी विधानसभेचा नवरदेव कोण असे सांगत खरे तर लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो तर निलंग्याचा दिल्लीत ठरतो म्हणूनच लातुरपेक्षा निलंगा लय भारी असे म्हणताच कार्यक्रमात हास्यकल्लोळ उडाला . सधाचे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर आहे तर दुसरीकडे शेतकरी अडचणीत , बाजारपेठ थंड , गॅस , शेतीची वीज , बस प्रवास , रेल्वे प्रवास यातून नागरिकांची पिळवणूक होत आहे .यासाठी आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे असे आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले .
लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो तर निलंग्याचा दिल्लीत-माजी मंत्री आमदार अमित देशमुख
