जिल्हा बँकेकडून उच्चशिक्षणासाठी ३७४,सभासदांना आजतागायत १२ कोटी ३१ लाख रुपयांचे शैक्षणीक कर्ज वाटप-चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांची माहिती
लातूर :-राज्यात अग्रेसर असलेली व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणुन कार्यरत असणारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अमेरीका व कॅनडा येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यांतील २ विद्यार्थ्याना ५० लाख रुपये शैक्षणीक कर्जाला मंजुरी देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हा बँकेच्या कर्ज समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून बँकेकडून आजतागायत उच्च शैक्षणिक कर्जाला ३७४ शेतकरी सभासदांना १२ कोटी ३१ लाख त्यात परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या १४ विद्यार्थ्याना बँकेकडून २ कोटी २३ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी बोलताना दिली
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी सभासदांच्या पाल्यास देशात व परदेशात उच्च शिक्षनासाठी वैधकिय , इंजिनियरिंग स्थापत्य, विशारद, एम. बी. ए,औषध शास्त्र पदवीधर वा पदव्युत्तर साठी बँकेकडून कर्ज मंजुरी देण्यात येत असून शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी मुख्यालयात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण परदेशात घेणाऱ्या (अमेरीका व कॅनडा) येथे एम एस करणारे तर दुसरा उच्चशिक्षण घेणाऱ्या कम्युटर सायन्स या दोन्हीं विद्यार्थ्याना प्रत्येकी २५ लाख रुपये शैक्षणीक कर्ज असे एकूण ५o लाख रुपये कर्जाला मंजुरी दिली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देत बँकेने शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्याची योजना आखली त्याला आता खूप मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज देणारी लातूर जिल्हा बँक सदैव तत्पर सेवा देत आहे
शुक्रवारी मुख्यालयात झालेल्या बैठकीला बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव संचालक अँड श्रीपतराव काकडे, पृथ्वीराज शिरसाठ, अशोकराव गोविंदपुरकर, व्यंकट बिरादार,अँड राजकुमार पाटील, अनुप शेळके, संचालिका सौ सपना किसवे, संचालिका सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते